Friday, March 23, 2012

सावली क्षणाची

सावलीत क्षणाच्या एका
स्वप्न माझे भुलून गेले
त्या सावलीच्या आड लपुनी
मीच माझे अस्तित्व विसरले
काळ नव्हता वेळ नव्हता
होती फक्त थंड सावली
हाच एक आधार जन्माचा
हेच समजून बसले
होते विश्व तिचेही
कधीच समजले नाही
निसर्गाच्या किंयेभोवती
प्रीत माझी भरकटली
रूप माझे लक्ख प्रकाशी
उबवित मजला होते
आसवांच्या त्या शब्दांना
जगन शिकवीत होते
जीवनाच्या त्या उदाहरणाला सोद्वयचेच होते
सुटणे सोपे नव्हते
तरी सूत्र शोधत होते ...

              रुपाली गणेश आगवणे


     

तथ्य

तथ्य होत तुझ्या सांगण्यात
उमगते आहे मला
निखाऱ्यावर पोळलेले पावूल
हिंदोळे घालतंय मनाला
जगात नसत कुणी कुणाचे
हेच खर असत
विश्व्मित्राच्या चाहुलीला
मन नेहमीच भुलत
चुकीची कबुली देत
आसू माझे ओझारतात
तुझ्या कुशीत तोंड लपवून
तेही सावरू पाहतात
का हा माझ्या आयुष्याचा
असा खेळ होतोय ?
उतरायचं नाही मला त्यात
पण डाव चढवावा लागतो
होते जे जे मज पाशी
ते सर्व हरून बसले
शक्य नाही मला आता
पूर्वीसारखे जगणे
कारण माझे सर्व आधार
मी काळात झोकून दिलेत

           रुपाली गणेश आगवणे


     

अस्तित्व


या अजनबी दुनियेत
कोण कोणाचे असते
क्षणभर आपलेसे वाटते
अस्तित्वात मात्र ते कधीच आपले नसते

आयुष्यभर नेहमीच एकटेच
पुढे जायचे असते
कारण आपल्या यशाचे मोरपीस
सर्वांनाच हवे असते

प्रेम जडताना कुणावर
एकावरच जद्वायाचे असते
कारण त्या प्रेमाच्या जोरावर
आयुष्य साकारायचे असते

माणसाचा माणसावर विश्वास
जडला पाहिजे
पण विश्वासाची काळी उमल्ण्याआधी
तोडून टाकायची नसते

                  रुपाली गणेश आगवणे


ऋतू

उन्हातील शांतता अलुभावायची असते
त्यातील दाह सहन करायचा असतो
पण डोक मात्र शांत ठेवायचं असत

पावसातील पाण्यात भिजायचं असत
कडक उन्हातले मृगजळ मात्र
कधीच विसरायचं नसत

हिवाळ्यात उब शोधायची असते
पण शेकोटीजवळ बसताना
उन्हाळ्याची आठवण ठेवायची असते




                   रुपाली गणेश आगवणे


स्त्रीच आयुष्य

स्त्रीच आयुष्य एक रांगोळी
जी काढते ती आपल्या मनासारखी
पण रंग त्यात भरत दुसराच कुणीतरी
अनोळखी पुरुषी त्याच्या मानासाठी

स्त्रीच आयुष्य एक मधाची पोळी
आयुष्यभर ज्यात ती मनाची गोडी भरते
पण रस त्याचा लुटतो दुसराच कुणीतरी
त्याच्या इच्छेने , त्याच्या तृप्तीसाठी

स्त्रीच आयुष्य एक कोरा कागद
ज्यावर  ती इच्छेने लिहू शकत नाही
पण त्या कागदावर लिहित दुसरच कुणीतरी
त्याच्या मनातील कल्पनांना वाव देण्यासाठी

स्त्रीच आयुष्य असते एक सुरवंट
जे होते कधीतरी एक फुलपाखरू
मन त्याच जडत एका फुलावर
तेही सोडून द्याव लागत कुटुंबाच्या मानासाठी ...
          
 
 
                            रुपाली गणेश आगवणे
 

अनोळखी

कोणास माहित कोण कोणाच्या आयुष्यात  असेल
कुठेतरी दूर आपलीच वाट पहाट असेल
जवळ असूनही कदाचित दूर भासत असेल
मनाच्या वस्तीत असूनही कुठे दूर राहत असेल
पण एके दिवशी तो नकीच माझ्याजवळ असेल
जीवनच्या ह्या सागराला भक्कम किनारा लाभेल
मनातील आठवणीना मग कदाचित नवी पालवी फुटेल
फुटली तर फुटली , त्याचा सुंगध फक्त माझ्या मनातच पाझरेल
पण त्या पाझार्ण्याला  सुधा बंधनाची साखळी असेल
कारण जीव लावणार कुणीतरी जिवलग असेल ...

                  रुपाली गणेश आगवणे



प्रीती

तुझ्या प्रीतीच्या सुगंधात न्हाले मी
तृप्तीचा आनद आकंठ प्यायले मी
तुझ्या गुलाबी सहवासात रमले मी
हर्षाचे धुंद सावलीत बुडाले मी

जन्मोजन्मी तुझ्या साथीची अपेक्षा करेन मी
क्शोक्षणी तुझ्याच हृदयात वसेन मी
कुठल्या अशा जगत विसरले स्वतःस मी
जिंकून ही तुला आज हरले आहे मी

कवितांच्या दुनियेत गुरफटून गेले आहे मी
थरथरत्या ओठांवरच शुष्क मौन विसरून गेले मी
आशेवर जगण्यास झुरून गेले आहे मी
आयुष्य असच काढायचं ठरवलं आहे मी
                       
                                                   रुपाली गणेश आगवणे