Friday, March 23, 2012

उणीव

मैत्रीच्या वाटेवर कुठेतरी चुकतो
मनात नसताना दुसरीकडे विसाव्यास थांबतो
हृदयात असत खूप पण हसू ओठावरच रुसून बसत दूर
चूक कबूल करत मन रडत असत
वाट शोधण्यास कुठे वाऱ्यावर हेलकावत असत
तूच येशील समजूत काढायला , वाट पाहत असत
तुझ्यात परत सामावण्यास आतुरलेल असत
डोळ्यातला दवबिंदुंची पहाट झालेली असते
फक्त तुझ्याच एका आशेची उणीव तिथे भासते ..

                           रुपाली गणेश आगवणे