Friday, March 23, 2012

कविता

कविता !!
काय  अर्थ असेल या शब्दाचा
कदाचित ,
क काव्याचा
वि विकासाचा
ता तालाचा
कविता म्हणजे
मनातील सुखाची , दुखाची  जाणीव
हृदयातील भावना
कोनाबाद्दल्चे अबोल प्रेम
मनातल्या विचारांची न सांगता येणारी चलबिचल
कागदावर हलकी करणे ....


                   रुपाली गणेश आगवणे