मीच माझी एकटी पुन्हा राहीन ह्या जगात
तुही सोडून जाशील मज ह्या फसव्या विश्वात
का हा मोह चढला मझं स्नेहाच्या ह्या दर्पणाचा
जीव गुंतला गेला माझा मैत्रीच्या ह्या प्रवाहात
जन्मोजन्मी तुझ्या हाताची गरज मला भासेल
कधीतरी मन मोकळे करण्यास उणीव तुझी जाणवेल
कुठे असेन मीच माझी कल्पना हि करवत नाही
पण तुझ्य्साठी राखलेला हृदयातील कप्पा कधीच बंद होणार नाही
मनाच्या चाल्बिचालीतून सावरणार मला कोण
तुझ्यावाचून माझ्या प्रश्नांना नेहमीच राहणार प्रश्नचिन्ह
एक एक करता करत दिवस जात आहेत
काळाचे हे घड्याळ मनाचे ठोके चुकवत आहेत
कधीतरी हे घड्याळ बंद आपल्यासाठी होणार आहे
निसर्गाला विसरून आपला वसंत रिमझिमणार आहे
त्या दिवसाच्या कल्पनेने मन माझे ..
नको कल्पना त्या दिवसाची , विरह तुझा मज जमणार नाही
मनात आहे विश्वास नक्की भेटू भविष्यातहि
फक्त विसरू नको भूतकाळातील ही सखी
रुपाली गणेश आगवणे