स्त्रीच आयुष्य एक रांगोळी
जी काढते ती आपल्या मनासारखी
पण रंग त्यात भरत दुसराच कुणीतरी
अनोळखी पुरुषी त्याच्या मानासाठी
स्त्रीच आयुष्य एक मधाची पोळी
आयुष्यभर ज्यात ती मनाची गोडी भरते
पण रस त्याचा लुटतो दुसराच कुणीतरी
त्याच्या इच्छेने , त्याच्या तृप्तीसाठी
स्त्रीच आयुष्य एक कोरा कागद
ज्यावर ती इच्छेने लिहू शकत नाही
पण त्या कागदावर लिहित दुसरच कुणीतरी
त्याच्या मनातील कल्पनांना वाव देण्यासाठी
स्त्रीच आयुष्य असते एक सुरवंट
जी काढते ती आपल्या मनासारखी
पण रंग त्यात भरत दुसराच कुणीतरी
अनोळखी पुरुषी त्याच्या मानासाठी
स्त्रीच आयुष्य एक मधाची पोळी
आयुष्यभर ज्यात ती मनाची गोडी भरते
पण रस त्याचा लुटतो दुसराच कुणीतरी
त्याच्या इच्छेने , त्याच्या तृप्तीसाठी
स्त्रीच आयुष्य एक कोरा कागद
ज्यावर ती इच्छेने लिहू शकत नाही
पण त्या कागदावर लिहित दुसरच कुणीतरी
त्याच्या मनातील कल्पनांना वाव देण्यासाठी
स्त्रीच आयुष्य असते एक सुरवंट
जे होते कधीतरी एक फुलपाखरू
मन त्याच जडत एका फुलावर
तेही सोडून द्याव लागत कुटुंबाच्या मानासाठी ...
रुपाली गणेश आगवणे