Friday, March 23, 2012

अबोला



चांदण्या राती कधी
एक तारा तुटला,
दोन जीवांच्या हृदयात
प्रेमाचा सूर छेडला ,
अबोल असे ते प्रेम
फक्त नयना पुरतेच मर्यादित
कधीतरी त्याला
जगत वावरण्यास दाद का मिळेल ?
व्यक्त न करता ते मनातच राहील?
थोड्या दिवसांचा तो नयन प्रवास
हृदयापर्यंत पोहचेल का ?
आणि त्याचं प्रेम त्यांना मिळेल का ?
स्वप्न त्यांच्या घराचं
दोघातच अपूर्व स्नेहाच
अशा आगळ्या प्रितीचे
खरच पूर्ण होईल का ?



           रुपाली गणेश आगवणे