या अजनबी दुनियेत
कोण कोणाचे असते
क्षणभर आपलेसे वाटते
अस्तित्वात मात्र ते कधीच आपले नसते
आयुष्यभर नेहमीच एकटेच
पुढे जायचे असते
कारण आपल्या यशाचे मोरपीस
सर्वांनाच हवे असते
प्रेम जडताना कुणावर
एकावरच जद्वायाचे असते
कारण त्या प्रेमाच्या जोरावर
आयुष्य साकारायचे असते
माणसाचा माणसावर विश्वास
जडला पाहिजे
पण विश्वासाची काळी उमल्ण्याआधी
तोडून टाकायची नसते
रुपाली गणेश आगवणे