Friday, March 23, 2012

भावविश्व

तुझ्या डोळ्यात पहिली मी
स्वप्नांची हिरवीगर्द बह्र्वेल
अन ,
त्या मोहक वेलीवर 
माझ्या मूक कामानाचे फुल
फुलायला अधीर
आयुष्याचा कोंडमारा झाला तरी
अस्तित्वाच्या चाहुलीने
माझ भावविश्व सूर्यास्ताच्या तेजाप्रमाणे चकाकते
सूर्योदयाचा गर्भ वाढवत...

  रुपाली गणेश आगवणे