मृगजळ
श्वासात माझ्या फुलला आज
ऋतू हिरवा वसंत
बहरले रूप माझे
मन झाले सुंगधीत
कुणाची ती ऐच्छिक साद
गुंतली माझ्या कानी
मज कळेना कोण
आहे तो अनोळखी
भेटीस त्याच्या आता
झाले मी आतुर
मन सावरेना मानस
झाले मी बेधुंद
नजरे समोर येताच
सावली तयाची
अनावर झाले डोळे
तृप्तीकाल्पनेने
परतुनी पाहता मागे
की घडले असे ते
आशेची माल तुटून
मृगजळ हाती पडले
रुपाली गणेश आगवणे